Posts

Showing posts from July, 2021

लसीकरणासाठी भ्रष्टाचार करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या शासनाने तोडले अकलेचे तारे

Image
∆   महाराष्ट्र सरकारकडून नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन. ∆   रेल्वे मध्ये किंवा कोठेही लस (वॅक्सीन) घेतलेले व न घेतलेल्यांमध्ये भेदभाव करता येणार नसल्याचे केन्द्र सरकारने दिलेले निर्देश व सर्वोच्च, उच्च न्यायालयांच्या आदेशाची अवमानना. ∆       व्हॅक्सीन कंपनीला हजारो कोटीच्या फायदा  पोहचविण्यासाठी शासनातर्फे बेकायदेशीर नियमांची  अंमलबजावणी. ∆       सी.बी.आय. चौकशीची मागणी. ∆     सर्वोच्च न्यायालयात ‘इंडियन बार एसोसिएशन’ व ‘अवेकन इंडिया मुव्हमेंट’ तर्फे याचिका दाखल करणार. अ‍ॅड. निलेश ओझा                                      राष्ट्रीय अध्यक्ष                             इंडियन बार  एसोसिएशन मुंबई  विशेष संवाददाता :-  केंद्र सरकारने व देशातील विविध न्यायालयांनी वेळोवेळी निर्णय देवून स्पष्ट कायदा ठरवून दिला आहे की कोरोना ची लस (वॅक्सीन) घेणाऱ्या व्यक्तीला सुद्धा पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते व तो सुद्धा कोरोनाचा संसर्ग पसरवू शकतो त्यामुळे त्या व्यक्तीला सुद्धा वॅक्सीन न घेतलेल्या व्यक्तीप्रमाणेच सर्व निर्बंध लागू राहतील. लस घेतलेल्या व्यक्तीमध्ये आणी लस न घेतलेल्या व्यक्तीमध्ये कोणत